त्र्यंबकेश्वर येथील पूजा व गुरुजी यांच्या माहिती व संपर्काच्या अधिकृत पोर्टलवर आपले स्वागत आहे. “त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” हे एक प्राचीन मंदिर असून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. त्यामागे कारण असे आहे कि साक्षात त्रिमूर्तींच्या रूपाने स्वयं श्रीब्रह्मा, विष्णु व महेश इथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास करतात.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराजवळ अनेक प्राचीन मंदिरे आहेत जसे- श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री केदारेश्वर मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री राम मंदिर, श्री कृष्ण मंदिर, श्री गायत्री देवी मंदिर, श्री गंगा गोदावरी मंदिर, स्वयंभू श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री बल्लाळेश्वर मंदिर, इ. त्याचप्रमाणे राम-लक्ष्मण तीर्थ, कंचन तीर्थ, बिल्व तीर्थ, गंगाद्वार जवळील वराह तीर्थ, कनखळ तीर्थ, प्रयाग तीर्थ, इंद्र तीर्थ आहेत. त्या सर्व तीर्थांमध्ये प्रमुख असे "कुशावर्त तीर्थ" देखील येथे आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी लुप्त होऊन ह्या कुंडात प्रकट होते. पौराणिक संदर्भानुसार कुशावर्त तीर्थाजवळ “श्री गौतम ऋषी” यांनी गंगेला अडवले होते म्हणून इथे गंगा नेहमीसाठी विद्यमान झाली, तेव्हापासून “गोदावरी नदी” ही “गौतमी गंगा” म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळेच ह्या ठिकाणी १२ वर्षातून एकदा “कुंभमेळा” भरतो. पौराणिक मान्यतेनुसार कुंभमेळ्यात ह्या तीर्थात स्नान केल्याने पापमुक्ती होऊन पुण्यप्राप्ती होते. ह्याचा लाभ घेण्यासाठी जगभरातून अनेक भक्त इथे स्नान करण्यासाठी येतात.
“तीर्थराज कुशावर्त” आणि ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिमूर्तींचे “त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” स्वरूप इथे प्रकट झाल्याने ह्या पुण्यभूमीत दान, पूजा, अनुष्ठान केल्याने पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक काळापासून भक्त पूजा-अनुष्ठान करण्यासाठी इथे येतात व क्लेषमुक्त होऊन आनंदाने परत जातात. स्कंद पुराण, पद्म पुराण यात त्र्यंबकेश्वरचे माहात्म्य वर्णन केलेले आढळते.
त्र्यंबकेश्वर मंदिरात वंशपरंपरागत अधिकार प्राप्त पुरोहित आहेत, ज्यांनी पिढ्यानपिढ्या पूजेसाठी येत असलेल्या यजमानांची व त्यांच्या पूर्वजांची नामावली मोठ्या परिश्रमाने जतन करून ठेवली आहे. ह्या नामावलीत त्यांनी केलेल्या पूजा-अनुष्ठान व धार्मिक विधी केल्याचा इतिहास लिहिलेला आढळतो. या पुण्य भूमीचे महात्म्य जाणून इथे दरवर्षी अनेक देशातून श्रद्धाळू पूजा अर्चना करण्यासाठी येतात.
त्र्यंबकेश्वर मंदिरात अनेक अधिकृत पुरोहित विविध पूजा करतात. त्यांना त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा -विधी करण्याचा परंपरागत अधिकार आहे. भक्तांना ह्या पुण्य स्थळी योग्य पूजेचा लाभ घेता यावा व त्यांची आर्थिक व भावनिक फसवणूक होऊ नये या उद्देशाने इथल्या अधिकृत पुरोहितांना नोंदणीकृत "ताम्रपत्र" प्रदान करण्यात आले आहे. ताम्रपात्र हे स्थानिक गुरुजींचे परंपरागत अधिकर असल्याचे प्रमाण दर्शवतात. हे प्रमाण त्यांना पेशव्यांनी दिलेले आहे देशविदेशातून येणारे अनेक भाविक इथे "ताम्रपत्रधारी" पुरोहितांकडूनच पूजेचा लाभ घेतात.
भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकेश्वर मध्ये नोंदणीकृत "पुरोहित संघ संस्था" स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेद्वारे पुरोहितांची अधिकृत समिती नेमलेली आहे, ज्यांना नोंदणीकृत प्रमाणपत्र व ताम्रपत्र बहाल करण्यात आले आहे. या ताम्रपत्रावर पुरोहित संघाचा प्रतीक चिन्ह (लोगो) आहे, जे पुरोहितांच्या अधिकृत असल्याची ओळख आहे. त्यामुळे भक्तांनी अधिकृत "ताम्रपत्रधारी" पुरोहितांकडूनच पूजेचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. हे गुरुजी इथले स्थानिक तीर्थपुरोहित आहेत म्हणजेच अनेक पिढ्यांपासून हे गुरुजी त्र्यंबकराजाच्या सेवेत आहेत व इथल्या सर्व पूजा ते खूप मनोभावे करतात याची भक्तांनी विशेष नोंद घ्यावी
हे वेबपोर्टल म्हणजे त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत पुरोहित (गुरुजी) आणि इथे येणारे भक्तगण यांमधील एक डिजीटल दुवा आहे. ह्या वेब पोर्टल द्वारे भक्तांना त्र्यंबकेश्वर मंदिराचा प्राचीन इतिहास, परंपरा, आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पूजेबद्दलची सखोल माहिती जसे कि नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्प पूजा, महामृत्युंजय जप , रुद्राभिषेक आदि पूजा या स्थानांवरच का कराव्यात , याचे स्थानमहात्म्य तसेच संबंधित असलेल्या अधिकृत पुरोहितांची यादी व माहिती मिळेल.
भक्तांना त्र्यंबकेश्वर मंदिराची माहिती सुगम व्हावी व यजमानांना सर्व अधिकृत पुरोहितांशी प्रत्यक्ष संपर्क करता यावा, हा प्रामाणिक प्रयत्न ह्या वेबपोर्टलच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या ह्या आधुनिक युगात भक्तांमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमधील विविध पुरोहितांमध्ये हे डिजिटल माध्यम आहे ज्याला “पुरोहित संघ संस्था” यांनी समर्थन दिलेले आहे. हे वेब पोर्टल एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे यजमान संबंधित पुरोहितांपर्यंत पोहचू शकतात.
हे पोर्टल बनवण्यामागे आमचे ध्येय पारदर्शी आहे ज्यातून त्र्यंबकेश्वरमधील आध्यात्मिक वारसा, पुरोहित/गुरुजी, संस्कृती, समाज, आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास व पूजा-अनुष्ठान याबद्दलची सुगम माहिती देश-विदेश पसरावी हे आहे .
आपल्या सर्व शंकांचं निवारण दिलेल्या व्हाट्स-ऍप क्रमांकाद्वारे किंवा प्रत्यक्ष कॉल करून केले जाईल. ह्या वेबपोर्टलद्वारे केवळ एका क्लिकच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर गुरुजींशी थेट संवाद आपण करू शकता. उदाहरणार्थ, त्र्यंबकेश्वर मध्ये कुठल्या पुजा केल्या जातात व त्या कशा करता येतील? पुजा कधी केली पाहिजे? केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरात अथवा मंदिर परिसरातच पुजा का केली पाहिजे? अशा शंका असतील तर आपण थेट पुरोहितांना विचारू शकता.
ह्या वेब पोर्टल च्या मदतीने सर्व भक्तांना त्र्यंबकेश्वर मंदिरात अधिकृत पुरोहितांकडून केल्या जाणाऱ्या विविध पूजांबद्दल सोपी व अचूक माहिती मिळावी, हाच आमचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे पोर्टलवर विविध पुरोहितांचा फोटो/व्हिडीओ देण्यात आला आहे ज्यावरून तुम्हाला त्र्यंबकेश्वर गुरुजींबद्दल माहिती मिळेल व आपण सहजरित्या कोणतीही पूजा बुक करू शकाल.
ह्या वेब पोर्टलवर पूजा संबंधित अद्ययावत माहिती आमच्या लेख विभागात उपलब्ध आहे. आपण लेख विभागाचे पान उघडून वाचू शकता जिथे त्र्यंबकेश्वर आणि त्यासंबंधी विस्तृत माहिती दिली आहे. तसेच ह्या वेबपोर्टलच्या साहाय्याने आपण श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे लाईव्ह दर्शन देखील घेऊ शकता.
माहिती ही एक महान शक्ती आहे, त्यामुळे हि आशा आहे कि त्र्यंबकेश्वर बद्दलची योग्य व अधिकृत माहिती आपणापर्यंत पोचावी. आपणास पूजेविषयी काहीही शंका किंवा सल्ला हवा असेल तर वेबपोर्टलवरून थेट आपण गुरुजीपर्यंत संपर्क करू शकता. मंदिराचा प्राचीन इतिहास आणि ह्या पुण्यभूमीचे गौरव जाणण्यासाठी एकदा अवश्य भेट द्यावी. तसेच कुठलीही महत्वाची पूजा-अनुष्ठान करावयाचे असल्यास मंदिर परिसरातील "ताम्रपत्रधारी" गुरुजींकडूनच करावी, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. आपल्या अमूल्य सल्ल्यांचा आम्ही हृदय पूर्वक स्वीकार करतो.
हि वेबसाइट “एरिक इन्फोलिंक ग्लोबल सर्विसेज प्राइवेट लिमिटेड” द्धारा निर्मित आहे.
Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved
Designed and Developed By | AIGS Pvt Ltd