"त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे"
FAQ's
कालसर्प योग शांती पूजा
कालसर्प योगाचा काय परिणाम होतो?
कालसर्प योगाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न असतो आणि तो व्यक्तीच्या
जन्मकुंडली मधील ग्रहांच्या स्थिती वर अवलंबून असतो.
काल सर्प योगाचे उपाय काय आहेत?
कालसर्प योग दोषाचा हानिकारक प्रभाव कमी करण्यासाठी, ‘‘काल सर्प योग शांती
पूजा’’ नामक विधी करणे अत्यावश्यक आहे
एखाद्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास काय परिणाम होतो?
एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत राहू आणि केतू समोरासमोर येऊन बाकी ग्रह मधे
आले असतील तर अशा व्यक्तीला वैवाहिक, शैक्षणिक आणि आर्थिक जीवनावर संकटे
उद्भवतात.
काल सर्प दोष शांती पूजा कोणी करावी?
ज्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीत (जन्मपत्रिकेत) कालसर्प योग् नावाचा दोष आहे अशा
व्यक्तीने काल सर्पयोग शांती पूजनाचा विधी करावा .
काल सर्प योग शांती पूजेमध्ये कोणत्या मंत्रांचा जप करावा?
ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये काल सर्प योग आहे ते विविध मंत्र जसे श्री सर्प
सूक्तम, महामृत्युंजय मंत्र, विष्णू पंचाक्षरी मंत्र अशा मंत्रांचा जप करू
शकतात.
काल सर्प योग शांती पूजा कधी केली पाहिजे?
नागपंचमीच्या दिवशी अथवा काही विशिष्ट तिथींना ताम्रपत्रधारी गुरुजींच्या
सल्ल्यानुसार काल सर्प योग शांती पूजा केली जाते.
काल सर्प योग शांती पूजेसाठी दक्षिणा काय आहे?
दक्षिणा मुख्यत: काल सर्प योग शांती पूजा तसेच शांती हवनसाठी आवश्यक असलेल्या
समाग्रीवर अवलंबून असते.
त्रिपिंडी श्राद्ध पूजा
पूर्वजांच्या असंतुष्ट इच्छेमुळे निर्माण झालेल्या पितृदोषापासून मुक्ति कशी मिळते?
आपल्या घरातील पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर
परिसरात त्रिपिंडी श्राद्ध अनुष्ठान केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते.
त्रिपिंडी श्राद्ध का केले पाहिजे?
त्रिपिंडी श्राध्द विधी हि कुटुंबातील मृत असंतुष्ट आत्म्याच्या शांती
प्रित्यर्थ केले जाते.
त्रिपिंडी श्राद्ध केव्हा केले पाहिजे?
त्रिपिंडी श्राध्द करण्यासाठी श्रावण, कार्तिक, पौष , माघ, फाल्गुन , व वैशाख
महिन्यातील पंचमी , अष्टमी, एकादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, आणि अमावस्या ह्यापैकी
कुठल्याही एका दिवशी तारपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या मुहूर्तावर केलेले उत्तम
असते.
त्रिपिंडी श्राध्द विधी ही पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी सुचवली जाते?
त्रिपिंडी श्राध्द विधी पितृदोषामुळे होणाऱ्या अडचणींना दुर करण्यासाठी केली
जाते.
त्रिपिंडी श्राध्द करण्यासाठी किती कालावधी आवश्यक आहे?
त्रिपिंडी श्राध्द विधी साठी पूर्ण दिवस गरजेचा असून, जर हा विधी अन्य विधी
सोबत करण्यात आला तर जास्त कालावधीची आवश्यकता आहे.
त्रिपिंडी श्राध्द पूजा कोणी केली पाहिजे?
परिवारातील कर्ता पुरूष/ (मोठ्या मुलाने) आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ
त्रिपिंडी श्राद्ध ही पूजा केली पाहिजे, एकट्या स्त्रियांना ही पूजा करण्यास
अनुमती नाही.
त्रिपिंडी श्राध्द करताना काय बंधनकारक असते?
त्रिपिंडी श्राध्द विधी करताना सात्विक भोजन करणे बंधनकारक असते. कांदा , लसूण,
जिरे, काळे मीठ, मसूर डाळ इ. पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे.
तर्पण म्हणजे काय?
तर्पण म्हणजे मृत आत्म्याच्या शांती प्रित्यर्थ केलेले कार्य आहे; ज्यात पाणी,
अन्न, तीळ अशा पदार्थांचा नैवद्य पूर्वजांना अर्पण केला जातो.
कन्या पिंड दान प्रदान करू शकतात का?
होय, कोणीही त्यांच्या परिवारातील मृत सदस्याला पिंड दानाची सेवा प्रदान करू
शकता.
त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी दक्षिणा काय आहे?
त्रिपिंडी श्राद्ध पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीवर दक्षिणा अवलंबून आहे.
महामृत्युंजय मंत्र जप
महामृत्युंजय मंत्र जप करण्यासाठी किती वेळ आवश्यक आहे?
साधारणतः ७ ते ८ तास महामृत्युंजय मंत्र जाप करण्यासाठी आवश्यक आहे.
महामृत्युंजय मंत्राचे पठण किती प्रकारे केले जाऊ शकते?
महामृत्युंजय मंत्र जाप दोन प्रकारे करता येते, ज्यात वैयक्तिक आणि सामूहिक जप
समाविष्ट आहे.
महामृत्युंजय मंत्र जप करण्यासाठी मुहूर्त काय आहे?
पहाटे ४:०० वाजता ब्रह्म मुहूर्तावर महामृत्युंजय जप करण्याचे अनेक फायदे आहेत.
महामृत्युंजय मंत्र जप का केला पाहिजे?
सर्वोच्च देवता महादेवांचा आशिर्वाद प्राप्त करून, सुखी व निरोगी आयुष्य
मिळण्यासाठी महामृत्युंजय मंत्र जाप केला जातो.
महामृत्युंजय मंत्र जप करण्यासाठी शुभ दिवस कोणता?
श्रावण, कार्तिक सारख्या महिन्यात सोमवारी महामृत्युंजय मंत्र जप केल्याने अधिक
लाभ होतो. याशिवाय “ताम्रपत्रधारी” गुरुजींनी दिलेल्या योग्य मुहूर्तावर हा
मंत्र जप करता येतो.
महामृत्युंजय मंत्र जप विधीसाठी दक्षिणा काय आहे?
महामृत्युंजय जप विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीवर दक्षिणा अवलंबून आहे.
नारायण नागबळी पूजा
नारायण नागबळी पूजा का केली जाते?
घरातील पित्रांच्या शांतीसाठी आणि एखाद्याकडून जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने
नागाचा मृत्यू झाला असेल तर अशा नागाच्या आत्मशांतीसाठी नारायण नागबली पूजा
केली जाते.
मोक्ष नारायणबळी पूजा आणि नागबळी पूजा वेगवेगळ्या आहेत का?
होय. मोक्ष नारायणबळी पूजा ही पितृ दोष निवारणासाठी नागबळी पूजेसोबतच केली
जाते. हि पूजा वेगळी केली जात नसल्याने यास नारायण नागबळी पूजा म्हटले जाते.
नारायण नागबळी पूजेसाठी किती दिवसांचा कालावधी लागतो?
नारायण नागबळी अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी एकूण ३ दिवसांचा कालावधी (रोज ३ ते ४
तास) आवश्यक आहे.
नारायण नागबळी पूजेसाठी कोणते वस्त्र परिधान केले पाहिजे?
नारायण नागबळी पूजेसाठी अनुष्ठान कर्त्या पुरुषांना पांढरी धोती आणि महिलांना
पांढरी साडी किंवा पंजाबी ड्रेस परिधान करणे अनिवार्य आहे.
नारायण नागबळी पूजेची दक्षिणा काय आहे?
नारायण नागबळी पूजेसाठी लागणाऱ्या आवश्यक सामग्रीवर दक्षिणा अवलंबून आहे.
कुंभ विवाह
मंगळ दोषाचे निवारण कसे केले जाते?
कुंडलीमधील मंगळ दोष हा विवाहास होणाऱ्या विलंब अथवा अडचणींच्या वेळी लक्षात
येतो, तसेच यावर उपाय म्हणून कुंभ विवाह हा विधी केला जातो.
मंगळीक कन्येशी लग्न केल्यास काय परिणाम होतात?
मंगळीक कन्येशी लग्न केल्यास विवाहनंतर अनेक अडचणी जसे उदासीनता, ताण, तणाव
इत्यादींचा सामना करावा लागतो. जोडीदाराचा मृत्यू देखील होऊ शकतो
कुंभ विवाह विधी लग्नानंतर केला जाऊ शकतो का?
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा दोष असेल तर लग्नाआधी कुंभ विवाह विधी करणं
अनिवार्य आहे. किंवा जीवनातील अशांती आणि पत्रिकेतील मंगळ दोष घालवण्यासाठी हा
विधी लग्नानंतर देखील करता येतो.
मंगळीक असण्याचा काय फायदा आहे?
जी व्यक्ती मंगळीक असते, ती अतिउत्साही असून तिचे स्वप्नांवर लक्ष केंद्रित
असते.
कोणतीही व्यक्ति मंगळीक आहे हे कसे समजते?
जन्म कुंडलीद्वारे, ज्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये मंगळ ग्रह दुसऱ्या,
चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानावर स्थपित असेल तेव्हा अशी
व्यक्ती मंगळीक असल्याचे समजते.
जन्मपत्रिकेतील मंगळ दोष किती प्रकाराचे असतात?
जन्मपत्रिकेतील मंगळ दोष - आंशिक मंगळ, सौम्य मंगळ, तीव्र मंगळ असे आहेत.
अर्क विवाह म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या पुरुषांच्या जन्मपत्रिकेत मंगळ दोष उद्भवतो तेव्हा अशा
व्यक्तीचे अर्क विवाह म्हणजे मंदार वृक्षासोबत विवाह केला जातो व नंतर
जोडीदारासोबत विवाह केला जातो .
रुद्राभिषेक
रुद्राभिषेक म्हणजे काय?
महादेवांच्या ज्योतिर्लिंगावर विविध पदार्थानी (पंचामृताने) केला जाणारा अभिषेक
म्हणजे रुद्राभिषेक.
रुद्राभिषेक विधी कसा केला जातो?
रुद्राभिषेक ह्या विधीत पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर इ पदार्थांनी
शिवलिंगावर संस्कृत मंत्र आणि रुद्राष्टाध्यायी पठणाद्वारे अभिषेक व होम करून
शिवांना समर्पित केला जातो.
रुद्राभिषेक करण्याचे काय फायदे आहेत?
रुद्राभिषेक केल्याने अनेक फायदे होतात. जसे स्वास्थ्य, वैयक्तिक, शैक्षणिक
संबंधित प्रत्येक समस्या दुर होऊन जीवनात शांती समाधान आणि आनंद प्राप्त होतो.
रुद्राभिषेक हा विधी घरी करता येतो का?
त्र्यंबकेश्वर मंदिरात ११ पूरोहितांच्या मार्गदर्शनाखाली व संस्कृत रुद्र
सूक्ताच्या ओव्यांसोबत रुद्राभिषेक करणे घरी रुद्राभिषेक करण्यापेक्षा अधिक
लाभदायी आहे.
रुद्राभिषेक पूजा करताना कोणते पुष्प वापरणे वर्ज्य आहे?
पिवळ्या रंगाचे चंपक आणि केतकीचे फुल हे रुद्राभिषेक पूजा करताना महादेवाच्या
चरणी वाहणे वर्जित आहे.
रुद्राभिषेक करताना महिला शिवलिंगास स्पर्श करू शकतात का?
नाही, रुद्राभिषेक करताना महिलांना शिवलिंगास स्पर्श करण्याची परवानगी नाही,
परंतु त्या प्रार्थना करू शकता. तसेच सुवासिनी महिला हि पूजा आपल्या पती सोबत
करू शकतात.
रुद्राभिषेक झाल्यावर प्रदान केलेले दूध आपण प्राशन करू शकतो का ?
होय, रुद्राभिषेक संपन्न झाल्यावर शिव लिंगातून निघालेल्या दुधाचे सेवन करू
शकतो, याचा उपयोग प्रसादासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
रुद्राभिषेक विधीसाठी दक्षिणा काय आहे?
रुद्राभिषेक विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीवर दक्षिणा अवलंबून आहे.