अगदी नावाप्रमाणेच “कालसर्प योग” हा सर्व सौख्य हिरावून घेणारा अत्यंत घातक असा योग आहे. अशा योगास
कालसर्प म्हणण्यामागे कारण हे आहे कि कालसर्प योगात राहू व केतू असतात. त्यामुळे सर्व कार्यात अपयश येते. तसेच सर्व प्रकारच्या उत्कर्षांमध्ये अडचणी निर्माण होतात. हा योग बनल्यावर जातकास अनेक संघर्षातून जावे लागते व
अडचणींचा सामना देखील करावा लागतो.
कालसर्प योग हा कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत असू शकतो मग ती व्यक्ती श्रीमंत असो, गरिबीत असो,
राजकारणी, नोकरदार किंवा व्यावसायिक असो या भौतिक हुद्यांनी काही फरक त्यात होत नाही. अशा व्यक्तीला
सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्या तरीही अनेक संकटांना, कष्टाला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीला गुप्त
शत्रूंचा त्रास, अकस्मात अपघातांना तोंड द्यावे लागते.
‘‘अग्रे राहुरधः केतुः सर्वे मध्यगताः ग्रहाः ।
योगाऽयं कालसर्पाख्यो शीघ्रं तं तु विनाशय ।।
राहु केतु अंतराले सर्वे ग्रहा:नभस्थिता ।
कालसर्प योगाख्येन सर्वे सौख्य विनाशक ||’
मंत्राचा अर्थ - जातकाच्या कुंडलित जेव्हा राहू व केतू हे ग्रह समोरासमोर येतात व इतर सर्व
ग्रह ह्या दोघांच्या मध्ये येतात तेव्हा त्यास कालसर्प योग म्हटले जाते. हा योग जातकाचे सर्व सौख्य
हिरावून घेतो.
महत्वाचे निवेदन:-
सर्व यजमानांना विनंतीपूर्वक सूचित केले जाते कि, सर्व पूजा-विधी ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच कराव्यात. केवळ त्यांनाच परंपरागत अनेक पिढयांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूजा करण्याचा हक्क प्राप्त आहे. तसेच त्यांचेकडून करविल्या जाणाऱ्या पूजा ह्या आपणांस समाधान देतील आणि ज्यातून आपली फसवणूक होणार नाही. आमचा हाच प्रयत्न आहे कि आपण योग्य अशा अधिकृत स्रोतापर्यंत यावे.
कालसर्प दोष शांती पूजा:
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात केली जाणारी कालसर्प योग शांती पूजा अत्यंत लाभदायी आहे, याशिवाय श्री
महादेवाचे ज्योतिर्लिंग इथे असल्यामुळे प्राचीन काळापासून इथे हि पूजा होत आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात म्हणजेच ताम्रपत्रधारी गुरुजींच्या घरी कालसर्प योग शांती पूजा तसेच इतर शांती कर्म केले जातात. त्र्यंबकेश्वर हे
अध्यात्म संपन्न ठिकाण असून अनेक गुरुवर्यानी इथे तप केले आहे, ज्यामुळे इथे केलेली कालसर्प योग शांती
पूजा हि फलदायी होऊन जातकाला दोषमुक्त करणारी आहे. इथले ज्योतिर्लिंग हे श्री ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे
स्वयंभू स्थान आहे. त्रिमूर्तीचें स्वरूप हे त्रिकालाबाधित असून सर्वदोष निवारक आहे, त्यामुळे अशा
पवित्र ठिकाणी कालसर्प योग शांती पूजा केल्यास तात्काळ शांती लाभते.
ह्या पूजेला ३ ते ४ तास लागतात. यजमानाने एक दिवस अगोदर त्र्यंबकेश्वर ला येऊन पूजेच्या दिवशी कुशावर्त तीर्थावर अंघोळ
करणे आवश्यक आहे, तसेच त्या दिवशी उपवास करणे गरजेचे आहे.
पूजेच्या दिवशी पुरुषांनी धोती-कुरता तसेच स्त्रियांनी साडी नेसावी. साडीचा रंग काळा किंवा हिरवा नसावा.
भोजन व निवासाची व्यवस्था त्र्यंबकेश्वरला केली जाते.
कालसर्प दोष शांती पूजा का करावी?
ह्या दोषामुळे जीवनात प्रत्येक कार्य उशिराने फळ देते, नौकरी अथवा व्यवसायात नुकसान, लग्न जमण्यास
उशीर अथवा नवदंपती मध्ये सततचे वादविवाद, कौटुंबिक एकोपा जाऊन तंटे निर्माण होऊ शकतात. श्री
क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये अधिकृत “ताम्रपत्रधारी” गुरुजींच्या मार्गदर्शनाने शास्त्रशुद्ध
पद्धतीने कालसर्प योग शांती पूजा केल्यास भाविकाला ह्या अडचणीपासून मुक्ती लाभते. हि पूजा ताम्रपत्रधारी गुरुजींच्या घरी योग्य मुहूर्तावर केली जाते.
कालसर्प योग शांती पूजेची पद्धती काय आहे?
- प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान करावे
- गणपती पूजनाने विधीची सुरवात होते
- नंतर पुण्यवाचन, मातृकापूजन व नंदी श्राद्ध गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केले जाते
- तदनंतर मुख्य देवता पूजन म्हणजेच राहू, केतू, चांदीचे नवनाग पूजन होते
- नवग्रह पूजन, रुद्र कलश पूजन संपन्न होते
- यानंतर गुरुजी स्थापित देवतांचे हवन (करणे अनिवार्य/बंधनकारक नाही) करतात (यजमानांच्या इच्छेप्रमाणे)
- बलिप्रदान करून गुरुजींमार्फत पूर्णाहुती दिली जाते
कालसर्प योग प्रकार :
जातकाच्या जन्म कुंडली प्रमाणे राहु व केतुचे स्थान आधारित करून एकूण १२ प्रकारचे कालसर्प योग तयार
होतात.
-
अनंत कालसर्प योग:
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत पहिल्या स्थानात
राहू व सातव्या स्थानात केतू दिसत
असून, इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “अनंत कालसर्प योग” तयार होतो. अशा वेळी
जातकाचे
विवाह जमून येण्यास अडचणी येऊ शकतात. विवाहाचे योग लांबणीवर जाऊ शकतात किंबहुना विवाह झालाच तर
वैवाहिक
जीवनात मतभेद कलह वाढून अशांती निर्माण होऊ शकते. अशा रीतीने विवाह टिकविण्यास सतत संघर्षाला
सामोरे
जावे लागते.
-
कुलिक कालसर्प योग:
जेव्हा कुणा एका व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत दुसऱ्या स्थानात
राहू व आठव्या स्थानात केतू दिसत
असून, इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “कुलिक कालसर्प योग” तयार होतो.
जातकाच्या
पत्रिकेत दुसरे स्थान हे आर्थिक गोष्टींना सांभाळणारे धन स्थान असते, त्यामुळे कुलिक कालसर्प
योग
निर्माण झाले असता अशा व्यक्तीला दारिद्र्य येऊ शकते. अशा व्यक्तीचे धन हे आरोग्यावर जास्त खर्च
होते,
त्यामुळे सततचे आजारपण उद्भवू शकते. जातकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.
-
वासुकी कालसर्प योग:
जेव्हा एखाद्याच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत तिसऱ्या स्थानात राहू व
नवव्या स्थानात केतू दिसत असून, इतर
ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “वासुकी कालसर्प योग” तयार होतो. ज्योतिष
शास्त्रात
वर्णिल्याप्रमाणे पत्रिकेत तिसरे स्थान हे कौटुंबिक सौख्याचे स्थान असल्याने जेव्हा हा योग
कुंडलीत असतो
अशा वेळी कौटुंबिक कलह, भाऊ-बहिणीशी वादविवाद, कोर्ट-कचेऱ्या, आई-वडिलांशी मतभेद आदी अडचणींचा
सामना
करावा लागू शकतो. त्यामुळे अशा जातकाला कौटुंबिक आनंद घेता येत नाही. जनमानसात गैरसमज निर्माण
होतात,
अपकीर्ती पसरते.
-
शंखपाल कालसर्प योग:
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत चौथ्या स्थानात
राहू व दहाव्या स्थानात केतू दिसत असून,
इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “शंखपाल कालसर्प योग” तयार होतो. जातकाच्या
पत्रिकेत
चवथे स्थान हे बाल्यावस्थेशी निगडित असते. बालपणाच्या काळात शिक्षण शिकत असताना शाळा बुडवणे
किंवा
अभ्यासात लक्ष नसणे, वारंवार नापास होणे, वाईट मित्रांची संगत लागणे यासारख्या गोष्टी घडतात.
ज्यामुळे
शिक्षण अर्धवट राहू शकते किंवा शिक्षण टप्याटप्याने पूर्ण होते अथवा जीवनात आवडीचे शिक्षण
क्षेत्र
निवडता येत नाही. शिक्षणात बदल होतो, अथवा शिक्षणाचे स्थान नेहमी बदलते. शिक्षण घेताना एकाग्र
चित्त
होता येत नाही. जातकास वाहन चालवताना अपघात होण्याचा संभव होऊ शकतो. सतत निवास स्थान बदलावे
लागू शकते,
किंवा घरापासून लांब जावे लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. हे स्थान मातृसौख्य देखील दर्शवते.
त्यामुळे
आईच्या प्रकृतीच्या दृष्टीने समस्या देखील उद्भवू शकतात.
-
पद्म कालसर्प योग:
जेव्हा कुणा एका व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत पाचव्या स्थानात
राहू व अकराव्या स्थानात केतू दिसत
असून, इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “पद्म कालसर्प योग” तयार होतो. पंचम
स्थान हे
जातकाचे संततीसुख दर्शविते. ह्या स्थानात हा योग असल्यास संतती होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
संतती
झाल्यास अनेक आजारांनी ग्रासित होण्याची शक्यता असते.
-
महापद्म कालसर्प योग:
जेव्हा एखाद्याच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत सहाव्या स्थानात राहू व
बाराव्या स्थानात केतू दिसत असून, इतर
ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “महापद्म कालसर्प योग” तयार होतो. सहाव्या
स्थानापासून
जातकाचे आजारपण, नोकरी, धन इत्यादी बघितले जाते. त्यामुळे जातकाच्या कुंडलीत हा योग असल्यास
नोकरी अथवा
व्यवसायाच्या ठिकाणी सतत बदल होणे अथवा सुटणे घडू शकते. तसेच धना संबंधित नुकसान होऊ शकते. जसे
भागीदारीत व्यवसाय केल्यास नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी
गुप्त
शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता असते. जातकाला मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. सरकारी
कामकाजात
अडचणी येण्याची शक्यता असते.
-
तक्षक कालसर्प योग:
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत सातव्या स्थानात
राहू व पहिल्या स्थानात केतू दिसत
असून, इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “तक्षक कालसर्प योग” तयार होतो. सातव्या
स्थानावरून वैवाहिक जोडीदार कळतो. अशा जातकाचा जोडीदार स्वतःच्याच मतानुसार चालणारा असू शकतो.
ह्या
स्थानावरून लग्न लवकर अथवा उशिराने होईल हे देखील पाहता येते. हा योग पत्रिकेत असल्यास जातकाचे
लग्न
उशिरा होऊ शकते अथवा वैवाहिक जोडीदारा सोबत सततचे भांडण होऊ शकते. घटस्फोट होण्याची शक्यता
देखील वाढू
शकते. याशिवाय घरात चोरी होण्याची शक्यता असते. कोर्ट-कचेरीच्या ठिकाणी अपयश येऊ शकते.
-
कर्कोटक कालसर्प योग:
जेव्हा कुणा एका व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत आठव्या स्थानात
राहू व दुसऱ्या स्थानात केतू दिसत
असून, इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “कर्कोटक कालसर्प योग” तयार होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत आठवे स्थान हे अचानक धनलाभ दर्शविते. हा योग इथे असल्यास जातकाला
वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. पेन्शन, भत्ते अथवा विम्याची
रक्कम
प्राप्त होण्यास दीर्घ काळ लागण्याची शक्यता आहे. अशा जातकाला मित्रांकडून फसवणूक होऊ शकते.
व्यापाराच्या ठिकाणी कर्जबाजारीपणा येऊ शकतो. अचानक आर्थिक संकट उभे राहू शकते. जातकाची अकस्मात
मृत्यू
होण्याची देखील शक्यता असते.
-
शंखचूड कालसर्प योग:
जेव्हा एखाद्याच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत नवव्या स्थानात राहू व
तिसऱ्या स्थानात केतू दिसत असून, इतर
ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “शंखचूड कालसर्प योग” तयार होतो. हे व्यापार आणि
व्यापारानिमित्त विदेशातील प्रवास दर्शविते. ज्योतिष शास्त्रात वर्णिल्याप्रमाणे कुंडलीत
कालसर्प योग
असल्यास अशा व्यक्तीचे व्यापारात आर्थिक नुकसान होते, विदेश प्रवासात कष्ट उचलावे लागू शकतात.
अशा
व्यक्तीने केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ त्याला प्राप्त होत नाही. केलेले कार्य अचानक बिघडते
किंवा अनेक
कार्य एकाच वेळी केल्यामुळे जातकाचे कुठलेच कार्य वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे नौकरीच्या
अथवा
व्यवसायाच्या ठिकाणी मतभेद होऊन वैर निर्माण होण्याची शक्यता असते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती
होण्यास
अडचणी येऊ शकतात. अशा व्यक्तीला अर्थार्जन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जातकाच्या
सामाजिक
प्रतिष्ठेला नुकसान होऊ शकते.
-
घातक कालसर्प योग:
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत दहाव्या स्थानात
राहू व चौथ्या स्थानात केतू दिसत असून,
इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “घातक कालसर्प योग” तयार होतो. कुंडलीत दहावे
स्थान हे
पित्याचे स्थान असल्याने इथून भाग्य स्थान किंवा कर्म स्थान निश्चित केले जाते. हा योग दशम
स्थानात
असल्यास पित्यापासून दूर जाण्याचा प्रसंग येऊ शकतो. अशा व्यक्तीला पित्याकडून आर्थिक सहाय्य
लाभण्यात
अडचणी येतात. कर्म करण्यात आळशीपणा किंवा अतिकारमान्यतेमुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता
निर्माण
होऊ शकते. त्यामुळे मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. अशा वेळी जातकाला पितृदोषाचा सामना
करावा
लागू शकतो. राजकारणात अपयश येऊ शकते.
-
विषधर / विषाक्त कालसर्प योग:
जेव्हा कुणा एका व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत
अकराव्या स्थानात राहू व पाचव्या स्थानात केतू दिसत
असून, इतर ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “विषधर कालसर्प योग” किंवा “विषाक्त
कालसर्प
योग” तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार अकरावे स्थान हे लाभ स्थान मानले जाते. ज्यामुळे अशा
व्यक्तीने
केलेले मनसुबे, इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता इथून पाहिली जाते. एकादश स्थानात हा योग
आल्यास
जातकाने केलेल्या योजना विफल होतात. नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी पेलताना अपयश
येऊ
शकते. ज्यामुळे लोकांचा जातकावरील भरवसा उठतो परिणामी समाजात नाव खराब होऊन प्रतिष्ठा देखील
पणाला लागु
शकते. मित्र-मैत्रिणी व नातेवाईक दुरावतात ज्यामुळे एकाकीपणा येऊन जातकाला मानसिक नैराश्याला
बळी जावे
लागू शकते.
-
शेषनाग कालसर्प योग:
जेव्हा एखाद्याच्या जन्मपत्रिकेत/कुंडलीत बाराव्या स्थानात राहू व
सहाव्या स्थानात केतू दिसत असून, इतर
ग्रह या दोन ग्रहांच्या मध्ये असतील अशा वेळी “शेषनाग कालसर्प योग” तयार होतो. ज्योतिष
शास्त्रात
वर्णिल्याप्रमाणे बारावे स्थान हे व्यय स्थान मानले जाते. ज्यामुळे जातकाने केलेले मनसुबे,
इच्छा
आकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता इथून पाहिली जाते. द्वादश स्थानात हा योग आल्यास जातकाला कर्ज,
व्यसन,
अनैतिक जीवन, तुरुंगवास भोगावे लागू शकते. लोकांकडे वैयक्तिक पैसे अडकतात. आर्थिक भागीदारीत
पैसे अडकून
नुकसान होते. दुर्धर शस्त्रक्रिया, अकाली म्हातारपण देखील जातकाच्या वाट्याला येऊ शकते. जातकाला
मानसिक
आजार जडू शकतात. काही परिस्थितींमध्ये आत्महत्येसारखे प्रसंग देखील घडू शकतात.
कालसर्पाचा प्रभावकाळ :
कालसर्प योगाची शांती न केल्यास हा योग जातकाला निवारणा पर्यंत असतो असे शास्त्रानुसार म्हटले जाते.
कालसर्प योग शांती पूजा न केल्यास कशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते?
- भाग्योदय होण्यात अनेक प्रकारच्या अडचणी येणे.
- प्रत्येक कार्यात अपयश येणे.
- उपजीविकेचे साधन देखील लाभत नाही आणि लाभले तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागणे.
- वडिलोपार्जित धन-संपत्तीचा वारसदार होण्यात अडचणी येणे.
- शिक्षण पूर्ण होण्यात अडचणी येणे.
- विवाह होत नाही आणि झालेच तर विवाहभंग होण्याची शक्यता असणे.
- संततीस प्रतिबंध होतो.
- वृद्धापकाळात मुलांनी सेवा सुश्रुषा न करणे.
- सामाजिक मान-सम्मान, पद-प्रतिष्ठा प्राप्त करण्यास संघर्ष करावे लागणे.
- नोकरीत प्रमोशन न मिळणे.
- नोकरी अगर धंद्यात लक्ष न लागणे.
- सततचे आजारपण मागे लागणे.
- मानसिक नैराश्य येणे.
- घरात सतत अशांतिचे वातावरण असणे.
- कमाई पेक्षा खर्च जास्त होतो, ज्यामुळे दारिद्र्य येणे.
- कौटुंबिक स्थिती खराब होते, क्लेश निर्माण होणे.
- सतत रोगांनी ग्रस्त असणे
- अशाने या व्यक्तीची धर्म आणि परमेश्वरावरील श्रद्धा कमी होते आणि शेवटी तो नास्तिक बनणे.
आपण कालसर्प योग शांती पूजा कुठे करू शकता?
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केल्या जाणाऱ्या सर्व धार्मिक विधींपैकी एक म्हणजेच कालसर्प योग शांती पूजा. हि पूजा-विधी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजींच्या घरी केली जाते.
मंदिरात/कुठल्याही आश्रमात केली जात नाही.
कालसर्प योग शांती पूजा विधीसाठी किती कालावधी लागतो?
कालसर्प योग शांती पूजेला ३ तास लागतात.
कालसर्प योग शांती केव्हा करावी?
अमावास्येचा काळ हि पूजा करण्यास सर्वोत्तम मानला जातो. अथवा गुरुजींच्या दिलेल्या तारखेला / मुहूर्तावर
देखील हि पूजा संपन्न केली जाते.
कालसर्प योग शांती पूजेचे फायदेः
- आर्थिक प्रगति होऊन भरभराट होते.
- अडकलेले पैसे पुन्हा प्राप्त होतात.
- शत्रूंचा त्रास नष्ट होऊन मित्रांचे साहाय्य प्राप्त होते.
- कौटुंबिक सौख्य लाभते.
- पती-पत्नीमधील वादविवाद मिटतात.
- नोकरीमध्ये पदोन्नती होते.
- व्यवसायात यश मिळते. कर्ज मिटते.
- दांपत्यास संतती प्राप्त होते.
- धर्मावरील श्रद्धा दृढ होऊन आस्तिक्य स्थापित होते.
- सामाजिक पत सुधारते. पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान पुन्हा प्राप्त होतो.
पूजा मूल्य / दक्षिणा:
पूजा मूल्य / दक्षिणा ही पूर्णतः पूजेसाठी आवश्यक वस्तूंवर (पूजा सामग्री) अवलंबून आहे. कालसर्प योग
शांती पूजा संपन्न झाली की पुरोहितांना दक्षिणा देऊन ह्या विधीची सांगता होते.
महत्वाच्या सूचना:
- एकदा कालसर्प योग शांती पूजा सुरू झाल्यावर भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान सोडून कोठेही जाण्याची
परवानगी नाही.
- सर्व भक्त पूजेच्या दिवसांत केवळ सात्विक (कांदा आणि लसूण वर्जित) भोजन
ग्रहण करू शकतात.
- पूजा करणाऱ्या भक्तांना केवळ पांढरे वस्त्र प्रधान करण्याची परवानगी आहे. (जसे पुरुषांसाठी पांढरे
धोती, गमछा, रुमाल आणि स्त्रियांसाठी पांढरी साडी, काळ्या अथवा हिरव्या रंगाची
साडी नेसू नये).