“महामृत्युंजय मंत्र जप” हा महादेवांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम असा सहज करता येण्याचा मार्ग आहे.
महामृत्युंजय मंत्र हा श्री शंकराचा महामंत्र आहे. वसिष्ठ ऋषींनी या मंत्राचा महिमा श्री मृतसंजीवन
स्रोतात वर्णिला आहे. हा मंत्र योग्य अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जप करण्याचे विधान आहे. कारण यात
काही विशेष अशा यौगिक क्रिया असतात ज्या केवळ अध्यात्मसंपन्न अशा गुरूंकडे असतात.
महामृत्युंजय मंत्र:
‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’
- शुक्ल यजुर्वेद, माध्यंदिन संहिता, अध्याय ६, सूक्त ६०
श्लोकार्थ - हे प्रभू, आम्हा भक्तांना वारंवार संसार चक्रात टाकणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून
बाहेर काढा आणि अमृतत्व प्रदान करा. ज्या प्रमाणे परिपक्व झालेली काकडी वृक्षाला सोडते अगदी तसेच आम्ही
देखील हे संसार सहज सोडून आपल्या चरणाशी येऊन अमर होऊ असे आम्हाला वरदान द्यावे.
महत्वाचे निवेदन:-
सर्व यजमानांना विनंतीपूर्वक सूचित केले जाते कि,
सर्व पूजा-विधी ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच कराव्यात. केवळ
त्यांनाच परंपरागत अनेक पिढयांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूजा करण्याचा हक्क
प्राप्त आहे. तसेच त्यांचेकडून करविल्या जाणाऱ्या पूजा ह्या आपणांस समाधान देतील आणि ज्यातून आपली
फसवणूक होणार नाही. आमचा हाच प्रयत्न आहे कि आपण योग्य अशा अधिकृत स्रोतापर्यंत यावे.
महामृत्युंजय मंत्राचे महत्व:
हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. ह्या मंत्राच्या ध्वनी लहरींच्या कंपनातून शरीराभोवती दैवी शक्तीद्वारे
एक अदृश्य दैवी कवच निर्माण केले जाते. हे कवच धारण केल्यावर साधकाचे सर्व बाधांपासून रक्षण तर होतेच
शिवाय केलेल्या सर्व कार्यात यश प्राप्ती होते. ह्या दिव्य कवचामध्ये ३३ देवता असतात जे महामृत्यूंजय
मंत्रातील ३३ अक्षरांनी दर्शविले जातात. ह्या ३३ देवतांमध्ये ८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य, १ प्रजापति,
आणि १ षट्कार (इंद्र) आहेत असे प्राचीन धर्मशास्त्रात वर्णिले आहे.
ह्या मंत्राला अधिक प्रभावशाली करण्यासाठी पुढीलप्रमाणे मंत्रोच्चार केले जाते.
ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: !
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् !!
ॐ स्व: भुव: भू: ॐ स: जूं हौं ॐ !!!
एकाक्षरी मृत्युंजय मंत्र - हौं - स्वास्थ्य निरोगी राहण्यास हा मंत्र म्हटला जातो.
त्रयक्षरी (तिन) मृत्यूंजय मंत्र - ॐ जूं स: - सामान्यपणे असलेले आजार घालवण्यासाठी हा म्हटला
जातो. कमीत कमी २७ वेळा हा मंत्र जप करण्याचे विधान आहे.
चतुराक्षरी मृत्यूंजय मंत्र - ॐ हौं जूं स: - शल्यचिकित्सा किंवा दुर्घटना टाळण्यासाठी हा मंत्र
म्हटला जातो. शिवलिंगावर जलाभिषेक करुन ३ माळांचे जप करण्याचे विधान आहे.
दशाक्षरी मृत्युंजय मंत्र - ‘ॐ जूं स: माम पालय पालय’ याला अमृत मृत्युंजय मंत्र म्हटला जातो.
महामृत्युंजय मंत्र जप केव्हा केला पाहिजे?
- जेव्हा एखाद्या व्यक्तिसोबत लहान अशा दुर्घटना होतात, तेव्हा हा मंत्र जप केल्यास लाभ होतो
- निद्रेत अचानक बिघाड होऊन रात्री वारंवार झोप उघडणे
- अंगाचे कापरे होऊन भीती वाटणे
- निद्रेतून भय उत्पन्न होणारे स्वप्न येऊन दचकून जाग येणे
- घरातील गाय अथवा कुत्र्याचे अचानक निधन होणे
- घरात लावलेली वृक्ष अथवा वनस्पती अचानक वाळून जाणे
- जे कार्य सामान्यपणे झाले पाहिजेत ते थांबणे
- जेव्हा घरात कुणी व्यक्ती सतत आजारी असेल आणि वारंवार औषधे घेऊन देखील ठीक होत नसेल अशा वेळी हा
मंत्र जप केल्यास लाभ होतो
- कुठल्याही बाबतीत सतत चिंता भेडसावणे
महामृत्यूंजय मंत्र जप करताना काय काळजी घेतली पाहिजे?
- महामृत्युंजय मंत्राचा जप हा शिवलिंगाच्या ठिकाणी केल्याने त्वरित लाभ देतो
- जपकर्त्याने ब्रह्मचर्याचे पालन करावे. निर्व्यसनी राहूनच जप करावा अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात
- मंत्रजप करताना साधकाने आपले मुख पूर्व दिशेला ठेवावे
- मंत्रजप करण्याचे ठिकाण स्वच्छ, निर्मळ असावे. शिवलिंगाच्या ठिकाणी मंत्रजप केल्यास त्वरित फळ देतो
- मंत्रोच्चार शुद्ध असावा
- ब्रह्म मुहूर्तवर जेव्हा सुर्योदय झालेला नसतो आणि रात्र अस्ताला जाते त्यावेळी म्हणजेच पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान महामृत्यूंजय मंत्र म्हटल्यास अति लाभदायक आहे
- जलद गतीने अथवा खूपच हळूहळू मंत्र जप केल्यास लाभ होत नाही त्यामुळे साधकाने शांत चित्ताने मंत्र जप करावा
- मंत्रजप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ असेल तर अधिक लाभ होतो; कारण शंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे. हि माळ सहजपणे उपलब्ध होते. हि माळ १०८ रुद्राक्षाची असल्यास अति उत्तम. यात एक सुमेरू (मेरुमणी) असतो. जेव्हा साधक मंत्रजप करतो तेव्हा सुमेरू आल्यावर माळ मागच्या दिशेला उलटवून पुन्हा मंत्रजप सुरु केले जाते. मेरुमणी ओलांडू नये हि काळजी मात्र घ्यावी लागते, अन्यथा दोष लागतो. त्यामुळे गुरूंच्या सानिध्यात राहूनच मंत्र जप करण्याची विधी आत्मसात करावी
- मंत्रजप करताना गोमुखी (कापडी पिशवी) वापरावी जेणेकरून मंत्रजप करताना कुणी पाहू नये
- एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरावी, दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये
- मंत्रजप करताना मध्येच बोलू नये त्याने मंत्रजप खंडित होतो
- जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठू नये. किमान ५-१० मिनिटे शांत बसावे
- त्यानंतर शिवलिंगाला नमस्कार करून मगच आसन सोडावे
महामृत्युंजय मंत्र जप केल्याचे लाभ काय आहेत?
- महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मृत्युशय्येला खिळलेल्या व्यक्तींना देखील नवीन जीवन प्रदान होते
- ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत अकाली मरण असते अशा व्यक्तीने किंवा अशा व्यक्तीसाठी मंत्र जप केल्यास दुर्मरण टळते
- शरीराभोवती दिव्य कवच तयार होतात ज्यामुळे दुष्ट विघातक शक्तींपासून संरक्षण प्राप्त होते
- ह्या मंत्राच्या श्रवण तसेच पठन केल्याने शरीरातील आजार दूर होऊन नवचैतन्य निर्माण होते
- जीवनात केलेली पातके नष्ट होऊन सौख्य लाभते
- महामृत्युंजय मंत्राच्या जपाने घरातील नकारात्मक आणि दुष्ट बाधांपासून संरक्षण प्राप्त होते
- एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत दुष्ट ग्रह असेल तर त्याचे अनिष्ट प्रभाव नष्ट होते
- ११ वेळा महामृत्युंजय जप करून प्रवास केल्यास प्रवासाच्या ठिकाणी रक्षण होते
- दीर्घायु लाभते आणि निरोगी जीवन प्राप्त होते
- नित्य पठणाने मानसिक भीती नष्ट होते
- मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मकता लाभते
महामृत्यूंजय जप विधी त्र्यंबकेश्वर मध्येच का करावा?
महामृत्युंजय हे महादेवाचे एका स्वरूप आहे जे आपल्या भक्तांना अभयदान देतात.त्र्यंबकेश्वर हे जगातील एकमेव असे शिवलिंग आहे ज्यात ब्रह्मा-विष्णु-महेश हे ज्योतिर्लिंग रूपाने विराजमान आहेत आणि महामृत्युंजय हे महादेवाचेच स्वरूप आहे. तिन्ही शक्तींनी युक्त असल्यामुळे इथे केलेली पूजा, प्रार्थना, विधी तात्काळ लाभ देतात आणि भक्तांना कष्टातून बाहेर काढतात. इथे प्राचीन काळापासून ज्योतिर्लिंगाच्या सेवेसाठी गौतमी गंगा प्रकट झाली आहे. हि गौतमी गंगा अनेक युगांपासून दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखली जाते. दक्षिण वाहिनी नदीच्या ठिकाणी केलेले सर्व संकल्प सिद्धीस जातात अशी मान्यता आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला महामृत्युंजय जप केल्याने भक्तांचे मनोरथ पूर्ण होतात.
महामृत्युंजय जप विधी कशा रीतीने केला जातो?
- ज्या दिवशी महामृत्युंजय मंत्र जप करणे असेल त्यादिवशी, प्रथम ताम्रपत्रधारी गुरुजी आपल्यातर्फे संकल्प करतात
- संकल्पाद्वारे ते महादेवांना प्रार्थना करतील, आम्ही निश्चयपूर्वक प्रण घेतो कि आम्ही १२५००० जप महामृत्युंजय मंत्राचा पुरश्चरण करून हवानादि कार्ये पूर्ण करू. कृपया करून हे महादेव आपण यजमानांना कृपा आशीर्वाद देऊन दीर्घायु आणि निरोगी जीवन प्रदान करावे. ते ज्या कारणासाठी आले आहेत त्यांचे ते मनोरथ सिद्ध करावे हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आम्ही करीत आहोत
- हे संकल्प आपल्या महाशक्तीने पूर्णत्वास न्यावे यात विघ्न येऊ नये, हि प्रार्थना केली जाते
- पूजेसाठी आलेल्या व्यक्तीचे (यजमान) नाव, पित्याचे नाव, आडनाव विचारल्यावर गुरुजी मंत्र जप करतात. ज्यात ८ ते १० तास लागू शकतात. मुख्य गुरुजींसोबत आणखी गुरुजी देखील असतात तेही पूजा संपन्न करतात. साधारणपणे ५ - ७ गुरुजी असतात. मंत्रजप पूर्ण झाल्यावर शिवलिंगावर सुगंधी फुले अर्पित केली जातात आणि दूध व जलाने अभिषेक केला जातो
- मंत्र जप आणि जलाभिषेक झाल्यानंतर रुद्रयागादि हवन केले जाते
- गुरुजींना दान दक्षिणा देऊन पूजेची सांगता होते
महामृत्युंजय जप विधीसाठी लागणारे वस्त्रे काय आहेत?
पुरुषांनी धोती, कुरता, गमछा अथवा रुमाल, उपरणे त्याचप्रमाणे स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. पूजेसाठी स्त्रियांनी काळी साडी नेसू नये.
पूजा मूल्य / दक्षिणा
महामृत्युंजय जप विधी त्र्यंबकेश्वरमधील अधिकृत गुरुजीं कडून केली जाते त्यामुळे पूजेची दक्षिणा हि पूजेसाठी आवश्यक असलेली सामग्री व पूजेसमयी उपस्थित असलेल्या ‘‘ताम्रपत्रधारी’’ गुरुजींवर अवलंबून आहे. हा जप विधी ऐनवेळी करता येत नाही त्यामुळे योग्य वेळ ठरविण्यासाठी आजच ताम्रपत्रधारी गुरुजींशी संपर्क करून सुनिश्चित व्हावे.
महत्वाची सूचना: कृपया भाविकांनी पूजा-हवनादि शुभ कार्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातच करावी, कारण त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ज्योतिर्लिंगाचे तेजोवलय असल्याने सर्व पूजा तात्काळ फळ प्रदान करतात. पुरातन काळापासून ताम्रपत्राचा अधिकार असलेले पुरोहित इथे वंशपरंपरेने पूजा करतात. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केले जाणारे विधी हे अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच करावे ज्यातून आपणास शांती, समाधान, आणि मनोकामनांची पूर्ती लाभेल हीच आमची आशा आहे. आमचा उद्देश आपणास अधिकृत स्रोताशी जोडण्याचा आहे.