Trimbak Mukut

त्र्यंबकेश्वर शिव मंदिरा मधे होणाऱ्या रुद्राभिषेक पूजेचे महत्त्व.

"त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधील एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे"
trimbak Mukut
body-heading-design रुद्राभिषेक body-heading-design

‘‘रुद्राभिषेक’’ हि महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्वाची पूजा आहे. कुणी महादेवांचे शंकर स्वरूपात पूजन करतो तर कुणी निराकार भजतो. सर्व १२ ज्योतिर्लिंगांपैकी त्रिमूर्ती स्वरूपातील एकमेव ज्योतिर्लिंग हे ‘‘त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग’’ आहे. जिथे आजही साक्षात रुद्र हे साकार रूपाने नटलेले दिसते. रुद्राभिषेक केल्याने महादेवाची भक्ती प्राप्त होते आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहज मार्गाने पूर्ण होतात. हि पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये केल्याने रुद्रदेव प्रसन्न होतात हा सर्वमान्य अनुभव भक्तांना आहे.

रुद्राभिषेक म्हणजे काय?

RUDRA ABHISHEKA

रूद्र अभिषेक हि शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे. सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते. भक्तांचे मनोरथ रुद्राभिषेकानी पूर्ण होतात. महादेवाची संपुर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जाते. केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी, अथवा महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाही. कारण ह्या कालावधीत श्री शंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात.

रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी सर्वउत्तोम पंडितजी

महत्वाचे निवेदन:-

सर्व यजमानांना विनंतीपूर्वक सूचित केले जाते कि, सर्व पूजा-विधी ह्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच कराव्यात. केवळ त्यांनाच परंपरागत अनेक पिढयांपासून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पूजा करण्याचा हक्क प्राप्त आहे. तसेच त्यांचेकडून करविल्या जाणाऱ्या पूजा ह्या आपणांस समाधान देतील आणि ज्यातून आपली फसवणूक होणार नाही. आमचा हाच प्रयत्न आहे कि आपण योग्य अशा अधिकृत स्रोतापर्यंत यावे.

रुद्राभिषेक पूजा केव्हा केली जाते?

याशिवाय पुढीलपैकी विशेष वेळी ते पूजेच्या ठिकाणी उपस्थित असतात, असे मानले जाते.

  • शुक्ल पक्षातील द्वितीया आणि नवमीला शंकर हे पार्वती माते सह दिव्यलोकी असतात
  • कृष्ण पक्षातील प्रतिपदा, अष्टमी आणि अमावस्या ह्या दिवशी शंकर हे पार्वती माते सह विहार करतात
  • कृष्ण पक्षातील चतुर्थी आणि एकादशी ह्या दिवशी महादेव शंकर कैलास पर्वतावर निवास करतात
  • शुक्ल पक्षातील पंचमी आणि द्वादशी ह्या दिवशी शंकर कैलास पर्वतावर असतात
  • कृष्ण पक्षातील पंचमी आणि द्वादशी ह्या तिथीस महादेव नंदी वर विराजमान होऊन संपूर्ण विश्वाचे भ्रमण करतात
  • शुक्ल पक्षातील षष्ठीला देखील महादेव विश्व भ्रमण करतात

रुद्र म्हणजे काय?

रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप आहे. जेव्हा ह्या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते, आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार हेच एकमेव सत्य आहे. रुद्र हि शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा-विष्णु-महेश प्रकट होतात.

“कार्यं विष्णुः क्रिया ब्रह्मा कारणं तु महेश्वरः ।
प्रयोजनार्थं रुद्रेण मूर्तिरेका त्रिधा कृता ||”

- रुद्रहृदयोपनिषत्

श्लोकार्थ - विश्वाच्या निर्मितीसाठी स्वतः रुद्राने कार्य रूपाने विष्णु, क्रिया रूपाने ब्रह्मा तर कारण रूपाने महेश हे स्वरूप धारण केले आहे.

रूद्र मंत्र | Rudra mantra

ॐ नमः भगवतेः रुद्राय | 

पंचाक्षरी मंत्र | Panchakshari mantra

ॐ नमः शिवाय | 

रुद्राभिषेक कसा करावा:

शंकर हि देवता कुठल्याही औपचारिकतेला वाव न देता केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने प्रसन्न होते आणि त्यामुळे शंकरांना ‘भोलेनाथ’ किंवा’ ‘भोला भंडारी’ देखील म्हटले जाते. शंकर आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात. भयभीत किंवा शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे हे शंकर आपले आद्य कर्तव्य समजतात; त्यामुळे अगदी देवी देवतांपासून ते मानवापर्यंत अनेक युगांपासून शंकराची पूजा केली जाते. शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात.

शिवमहापुराणानुसार शंकराला रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे. या पुराणात रुद्राभिषेक विधी दिली आहे. शिव महापुराण वर्णिलेल्या प्रमाणे खालील द्रव्यांनी अभिषेक खालील विविध प्रकारे केले जाते.

  • जलाने रुद्राभिषेक केल्यास वृष्टि होते
  • कुशाजलाने अभिषेक केल्यास रोग आणि दु:ख नष्ट होतात
  • प्राणी, घर आणि वाहन हवे असेल तर अभिषेकात दही समाविष्ट करावा
  • उसाचे मधुर रस लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोगी आहे
  • मधयुक्त जलाने अभिषेक केल्याने धनसंचय वाढतो
  • तीर्थावरील जलाने अभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते
  • सुगंधी अत्तर मिश्रित जलाने अभिषेक केल्याने रोग नष्ट होतात
  • गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पुत्र प्राप्ति तसेच प्रमेह रोगात शांती आणि मनोकामना पूर्ण होते
  • गंगाजलाने अभिषेक केल्यास ज्वर बाधा नाश होते
  • सद्बुद्धि प्राप्त करण्यासाठी दूध आणि साखर मिश्रित अभिषेक केले जाते
  • गायीच्या दुधाने निर्मित शुद्ध तुपाने अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते
  • रोग आणि शत्रूंचा नाश करावयाचे असल्यास मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे लागते

अशा रीतीने श्रद्धापूर्वक रूद्र अभिषेककेल्यास कळत नकळत घडलेल्या पातकांपासून भक्तांची लगेचच सुटका होते आणि साधक धन-धान्य, विद्या, कुटुंब तसेच सामाजिक प्रतिष्ठेत उंचावतात

रुद्राभिषेकासाठी आवश्यक असणारी सामग्री कुठली ?

ABOUT RUDRA ABHISHEK
  • दूध
  • दही
  • शुद्ध तूप
  • मध
  • साखर
  • पवित्र जल
  • यज्ञोपवीत
  • अष्ट गंध
  • सुगंधी फुले
  • बेलाची पाने (बेलपत्र)
  • गंगाजल
  • अक्षदा
  • ऋतूनुसार उपलब्ध असलेली फळे
  • मिठाई

रुद्राभिषेक विधी कशाप्रकारे केला जातो?

शुक्ल यजुर्वेदात तैत्तिरीय संहितेथील कांड ४ मध्ये दहा अध्याय आहेत ज्याला ‘रूपक’ किंवा ‘षडंग’ पाठ म्हटले जाते. यापैकी ८ अध्याय हे रुद्राष्टाध्यायी आहेत. या आठ अध्यायांमध्ये महादेवाच्या रुद्र रूपाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. आठ अध्यायांचे पाठ झाल्यावर उर्वरित दोन पाठ म्हटले जातात ज्यास स्वस्ति प्रार्थनाध्याय शांत्यधाय म्हटले जाते. रुद्राभिषेकासाठी रुद्राष्टाध्यायी म्हटले जाते आणि शेवटी स्वस्ति वाचन करून शांती पाठ करण्याची प्राचीन परंपरा आहे.

संपूर्ण रुद्राभिषेक पाठ:

प्रथम अध्याय: रुद्राष्टाध्यायी मधील पहिला अध्याय हा ‘शिवसंकल्प सूक्त’ म्हटला जातो. हा अध्याय श्री गणेशांची कृपा प्राप्त होण्यासाठी म्हटला जातो. श्रीगणेशांचा प्रसिद्ध मंत्र यात आला आहे - ‘‘गणानां त्वा गणपति हवामहे’’

द्वितीय अध्याय: दुसरा अध्याय श्री विष्णु आणि लक्ष्मी ह्यांना प्रसन्न करण्यासाठी म्हटला जातो. यात एकूण १६ मंत्र आहेत ज्यास ‘पुरुष सूक्त’ म्हट्ले जाते. सर्व देवतांचे षोडशोपचार पूजन पुरुष सूक्तातील मंत्रानी केले जाते. ह्या अध्यायात लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे मंत्र देखील दिले आहेत.

तृतीय अध्याय: तिसरा अध्याय देवांचे राजा इंद्र यासाठी म्हटले जाते. या अध्यायला ‘अप्रतिरथ सूक्त’ म्हटले जाते. या मंत्रांनी शत्रूंचा नाश होतो.

चतुर्थ अध्याय चौथा अध्याय ‘मैत्र सूक्त’ नावाने ओळखला जातो. यातील मंत्रांनी सूर्यदेवाला प्रसन्न केले जाते.

पंचम अध्याय: रुद्राष्टाध्यायी मधील पाचव्या अध्यायास ‘रुद्राध्याय’, ‘शतरुद्रिय’ किंवा ‘रुद्रसूक्त’ म्हटले जाते. शतरुद्रिय पाठ म्हणजे ज्यात रुद्राची १०० नावे आहेत. यात रुद्राचे ‘नमो नम:’ हे शब्द वारंवार म्हटले जातात; ज्यास ‘नमकम्’ म्हटले जाते. रुद्राध्यायात येणाऱ्या मंत्राच्या प्रभावाने मनुष्याचे रोग व पाप नष्ट होऊन शत्रू वश होतात. वेदपठण केल्यास समान पुण्य लाभते.

षष्ठ अध्याय: रुद्राष्टाध्यायी मधील सहाव्या अध्यायास ‘महच्छिर’ म्हटले जाते. या अध्यायात प्रसिद्ध महामृत्युंजय मंत्राचा उल्लेख आला आहे.

सप्तम अध्याय सातव्या अध्यायास ‘जटाध्याय’ म्हटले जाते.

अष्टम अध्याय: यात २९ मंत्र आहेत. यात रुद्रदेवतेकडून मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते ‘च मे च मे’ ह्या शब्दांची पुनरावृत्ती होते त्यामुळे यास ‘चमकाध्याय’ म्हटले जाते. रुद्राष्टाध्यायी पाठाच्या समाप्ती करताना शान्त्याध्याय येतो ज्यात २४ मंत्र आहेत ज्यामुळे स्वस्तिवाचन केले जाते; ज्यात १२ मंत्र येतात. ज्यात स्वस्ति मंगलमयता, ऐहिक व पारमार्थिक कल्याण, शांती व समाधान यासाठी प्रार्थना केली जाते.

रुद्रांची संख्या अकरा असल्याने चमकाध्यायाची अकरा आवर्तने व नमकाध्यायाचे एक आवर्तन मिळून एक ‘रुद्र’ किंवा ‘रुद्री’ पाठ पूर्ण होतो. यास ‘एकादशिनी’ म्हटले जाते. अशा अकरा ‘एकादशिनी’ पाठ केल्याने एक ‘लघुरुद्र’ पाठ पूर्ण होतो. त्याचप्रमाणे ११ लघुरुद्र पूर्ण झाल्यावर १ ‘महारुद्र’ आणि ११ महारुद्र पाठ झाल्यावर ‘अतिरुद्र’ पाठाचे अनुष्ठान पूर्ण होते. रुद्री, लघुरुद्र, महारुद्र आणि अतिरुद्र पाठ संपूर्ण झाल्यावर रुद्राभिषेक संपन्न होते. त्यानंतर रुद्रयागादि होम केले जाते. ज्याने महादेवाचे संपूर्ण आशीर्वाद प्राप्त होतात.

‘लघुरुद्र’ पाठ करीत असताना शिवलिंगाचे अभिषेक केल्याने साधकास मोक्ष प्राप्ती होते.

‘महारुद्र’ पाठ, जप आणि होमादि केल्याने अति दारिद्रय असलेली व्यक्तीदेखील भाग्यवान होतो.

‘अतिरुद्र’ पाठाची तुलना कशानेच करणे शक्य नाही. या पाठाने ब्रह्महत्येसारखे पाप देखील नष्ट होते.

साधारण अभिषेक दुपारी बारा वाजेच्या आतच करावे असे शास्त्रात म्हटले आहे परंतु रुद्राभिषेक हा प्रदोष काळापर्यंत म्हणजेच संध्याकाळपर्यंत केला जाऊ शकतो.

पूजेसाठी सामग्री घेण्याच्या वेळी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • रुद्राभिषेकासाठी वापरात येणारे दूध हे पितळी भांड्यात ठेवू नये.
  • रुद्राभिषेकासाठी घेतली जाणारी अक्षता अखंड असावी, तुकडे नसावे.
  • बिल्व पत्र फाटकी नसावीत.
  • पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्ये केतकी हे फुल नसावे इतर सुगंधी फुले असावी.
  • तुळशीपत्र पूजेसाठी आणू नये.

रुद्राभिषेक केल्याने काय लाभ होतात?

HOW TO PERFORM RUDRA ABHISHEK POOJA
  • मनातील भीती नाहीशी होते, चिंता जाऊन निर्भयता येते.
  • सततचे आजारपण, दुर्धर रोग दूर होतात.
  • नात्यांमध्ये मधुरता येते.
  • आर्थिक अडचणी दूर होऊन धन संपत्तीत वृद्धी होते.
  • ह्या पूजेने पुनर्वसू, आश्लेषा आणि पुष्य नक्षत्रावरील कुंडली दोष नाहीसे होतात.
  • कर्क राशीत जन्म घेतलेल्या भाविकांसाठी हि पूजा अति लाभदायक आहे.
  • ह्या पूजेच्या प्रभावाने उत्तम, निरोगी आणि विद्वान संतती लाभते.
  • श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्यास सर्व तर्हेची संकटे नाहीशी होतात.
  • या पूजेने शत्रूदेखील वश होतात.
  • रुद्राभिषेकाने अकाली मरण टाळता येते.
  • ह्या पूजेने भूतबाधा नष्ट होतात.
  • नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होते.
  • व्यवसायात भरभराट होते.
  • शिक्षणात प्रगती होते, एकाग्रता साधली जाते.
  • अचानक येणारी जीवनातील संकटे नाहीशी होतात.
  • एखाद्याच्या पत्रिकेत चंद्र दोष असेल तर तो रुद्राभिषेकाने दूर होतो.

रुद्राभिषेक पूजा त्र्यंबकेश्वर मधेच का करावी?

रुद्र हि शिवाची त्रिगुणात्मक शक्ती आहे जी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगात सदा निवास करते. हे एकमात्र असे ज्योतिर्लिंग आहे, जिथे रुद्राची शक्ती त्रिमूर्तींच्या स्वरूपात असल्याने इथे केलेले रुद्राभिषेक तात्काळ फलित होते. संपूर्ण श्रावणमास, महाशिवरात्री आणि प्रदोष सारख्या महत्वपूर्ण दिवशी इथे भक्तांची गर्दी होते. तसेच हे ज्योतिर्लिंग रुद्र रूपाने प्रकट झाल्याने इथे वर्षभर रुद्राभिषेक होत असतात.

आमच्या अधिकृत वेब पोर्टलवरून आपण त्र्यंबकेश्वर मंदिरातील ताम्रपत्रधारी गुरुजींशी संपर्क करून रुद्राभिषेक पूजा करू शकतात. केवळ रुद्राभिषेक पूजा मंदिरातील गर्भगृहात केली जाते. याशिवाय अन्य पूजा हे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केल्या जातात. त्यापैकी महत्वाच्या नारायण नागबली, कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्राद्ध,महामृत्युंजय जाप पूजा हे आहेत.

रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला किमान एक दिवस अगोदर यावे. ताम्रपत्रधारी पुरोहित हे वेदविद्या संपन्न असून परंपरेने अधिकृत स्थानिक आहेत. त्यामुळे रुद्राभिषेक करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य गुरुजींकडे उपलब्ध असते. केवळ भाविकांनी रुद्राभिषेकला येण्या अगोदर त्यांना संपर्क करावा. आपल्या सर्व शंकाचे यथायोग्य समाधान गुरुजींकडून केले जाईल.

रुद्राभिषेक विधीसाठी लागणारे वस्त्रे काय आहेत?

पुरुषांनी धोती, कुरता, गमछा अथवा रुमाल, उपरणे त्याचप्रमाणे स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. पूजेसाठी स्त्रियांनी काळी साडी नेसू नये.

पूजा मूल्य / दक्षिणा रुद्राभिषेक पूजा हि त्र्यंबकेश्वरमधील अधिकृत गुरुजींकडून केली जाते त्यामुळे पूजेची दक्षिणा हि पूजेसाठी आवश्यक असलेली सामग्री व पूजेसमयी उपस्थित असलेल्या ‘‘ताम्रपत्रधारी’’ गुरुजींवर अवलंबून आहे. रुद्राभिषेक ऐनवेळी करता येत नाही त्यामुळे योग्य वेळ ठरविण्यासाठी आजच ताम्रपत्रधारी गुरुजींशी संपर्क करून सुनिश्चित व्हावे.

महत्वपूर्ण सूचना - गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नसल्याने केवळ पुरुषांना रुद्राभिषेक करण्याचे विधान आहे, कृपया याची नोंद घ्यावी. रुद्राभिषेक विषयी अधिक माहिती हवी असल्यास ताम्रपत्रधारी गुरुजींचा योग्य सल्ला घ्यावा.

Read Rudrabhishek in English

हिंदी में रुद्राभिषेक पढ़िए

FAQ's

महादेवांच्या ज्योतिर्लिंगावर विविध पदार्थानी (पंचामृताने) केला जाणारा अभिषेक म्हणजे रुद्राभिषेक.
रुद्राभिषेक ह्या विधीत पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर इ पदार्थांनी शिवलिंगावर संस्कृत मंत्र आणि रुद्राष्टाध्यायी पठणाद्वारे अभिषेक व होम करून शिवांना समर्पित केला जातो.
रुद्राभिषेक केल्याने अनेक फायदे होतात. जसे स्वास्थ्य, वैयक्तिक, शैक्षणिक संबंधित प्रत्येक समस्या दुर होऊन जीवनात शांती समाधान आणि आनंद प्राप्त होतो.
त्र्यंबकेश्वर मंदिरात ११ पूरोहितांच्या मार्गदर्शनाखाली व संस्कृत रुद्र सूक्ताच्या ओव्यांसोबत रुद्राभिषेक करणे घरी रुद्राभिषेक करण्यापेक्षा अधिक लाभदायी आहे.
पिवळ्या रंगाचे चंपक आणि केतकीचे फुल हे रुद्राभिषेक पूजा करताना महादेवाच्या चरणी वाहणे वर्जित आहे.
नाही, रुद्राभिषेक करताना महिलांना शिवलिंगास स्पर्श करण्याची परवानगी नाही, परंतु त्या प्रार्थना करू शकता. तसेच सुवासिनी महिला हि पूजा आपल्या पती सोबत करू शकतात.
होय, रुद्राभिषेक संपन्न झाल्यावर शिव लिंगातून निघालेल्या दुधाचे सेवन करू शकतो, याचा उपयोग प्रसादासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.
रुद्राभिषेक विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीवर दक्षिणा अवलंबून आहे.

तुमचे प्रश्न विचारा




-मोहन दिलीप पाटील Says
09-Jun-2022
माझी जन्म तारीख 29-05-1993 वेळ संध्याकाळी 07:15 वाजता नोकरी किंवा व्यवसायासाठी काय उपाय करावा.
टिप्पणी उत्तर
-Abhijit Dattatray Kavheमी Says
25-Apr-2022
मी खूप देवाची सेवा करतो पण मला यश येत नाही खूप अडचणी येतात
टिप्पणी उत्तर
-विश्वजीत भुंजे Says
03-Apr-2022
विष्णु श्राद्ध किंवा विष्णु बली हा विधी आपल्या इथे करतात काय? साधारण काय process असते? किती दिवसांचा विधी आहे? किती खर्च येईल?
टिप्पणी उत्तर
-अरूण आनंदराव देवळीकर Says
28-Mar-2022
रूद्रा अभिषक मुळे नुकसान कोणते होते ।काय करू नये ।
टिप्पणी उत्तर
-Srushti Khanekar Says
01-Mar-2022
मलापण करायचंय
टिप्पणी उत्तर
-श्री. रमेश बाळकृष्ण मेस्त्री Says
28-Feb-2022
काही विधी करायची असेल तर आपल्याशी संपर्क करेन धन्यवाद
टिप्पणी उत्तर
Load more

Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved

footer images

Designed and Developed By | AIGS Pvt Ltd