त्रिपिंडी म्हणजे ह्या श्राद्ध विधीमध्ये पिंड ठेवले जातात. सलग तीन वर्षांपर्यंत ज्या व्यक्तींचे श्राद्ध विधी केले नसतील अशा पित्रांना शांती मिळण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध कुठल्याही महिन्याच्या दोन्ही पक्षात (कृष्ण पक्ष/ शुक्ल पक्ष) येणाऱ्या पंचमी / अष्टमी/ एकादशी / त्रयोदशी / चतुर्दशी / अमावस्या ह्यापैकी कुठल्याही दिवशी करता येते.
पत्रिकेतील योगांप्रमाणे देखील त्रिपिंडी श्राद्ध विधी करता येतो. यासंबंधित अधिक माहितीसाठी या पोर्टलवरील अधिकृत गुरुजींसोबत चर्चा करूनच हा विधी संपन्न करावा.
वर्तमान पिढीपासून मागील तीन पिढीपर्यंत घरातील एखाद्या व्यक्तीचे धार्मिक तिथींप्रमाणे श्राद्ध विधी केले जात नसतील तर त्रिपिंडी श्राद्ध करण्याचे विधान धर्मग्रंथांमध्ये लिहिले आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे अकस्मात निधन झाले किंवा काही कारणास्तव कुटुंबियांपैकी एखाद्याचे लग्न न होता मृत्यू झाला असेल तर अशी व्यक्ती मृत्यूनंतर सद्गती प्राप्त होत नाही. याचा परिणाम वर्तमान पिढीतल्या लोकांवर होऊन त्यांना आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात, ज्यास पितृदोष म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो त्याच्या निवारणार्थ हि शांती करणे अत्यंत महत्वाचे आहे. सतत गर्भपात होत असल्यास, बालमृत्यू (४ महिन्यांचा गर्भ ते ९ वर्षांपर्यंतचे बालके) होत असल्यास त्रिपिंडी श्राद्ध विधी करावा. त्रिपिंडी श्राद्ध केल्याने असे पूर्वज पितृयोनीत असल्याने पूजेचा भोग स्वीकार करतात व तृप्त होऊन श्राद्ध कर्त्याला आशीर्वाद देतात. ज्यामुळे अशा व्यक्तीची भरभराट होऊन जीवनात शांती, समाधान व लक्ष्मी येते असे पुराणांमध्ये वर्णित आहे.
- अथर्ववेद
श्लोकार्थ - अथर्ववेदात असे सांगितले आहे कि- पिता, पितामह (आजोबा) व प्र-पितामह (पंजोबा) अशा तीन पिढीतल्या पूर्वजांना आम्ही श्राद्धाने तृप्त करतो.
सहा घराण्यातील पितरांना सदगती मिळण्याकरिता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.
श्लोकार्थ - पितृवंश, मातृवंश, गुरु, सासरे, सख्खा भाऊ, चुलत बंधू वरील सहा घराण्यांमध्ये दोष आढळले असता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे अतिप्राचीन असे धार्मिक स्थळ आहे. जीवात्म्यास मुक्ती देणारे त्रिमूर्ती श्री ब्रह्मा-विष्णु-महेश ज्योतिर्लिंग स्वरूपात निवास करतात आणि पित्रांना सद्गती प्रदान करणाऱ्या गौतमी गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर हे असल्याने दरवर्षी इथे श्रद्धाळू त्रिपिंडी श्राद्ध विधी करण्यासाठी एकत्र येतात. त्रिपिंडी श्राद्ध पूजा कुशावर्त तीर्थावर केली जाते.
- पद्म पुराण, अध्याय ११
श्लोकार्थ - सर्व तीर्थांमध्ये त्र्यंबकेश्वर हे संपूर्ण तीर्थ आहे. इथे स्वयं त्रिलोचन श्री शंकर विद्यमान आहेत. अशा परम पवित्र त्र्यंबकेश्वर महादेवाला माझे भक्तिपूर्वक नमस्कार असो.
त्रिपिंडी श्राद्ध आपल्या पूर्वजांना सद्गती प्रदान करणारा एक अगदी सहज व उत्तम असा मार्ग आहे. एखाद्या वस्तूच्या गोलाकार स्वरूपाला पिंड असे म्हटले जाते. प्रतीक रूपाने आपले शरीर देखील एक पिंडच आहे. म्हणून म्हटले जाते कि ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’. आपल्या भोवताली अनेक बाधा अथवा पिशाच्च हे उपस्थित राहून त्रास देतात. पृथ्वी वर वास्तव्य करणारे पिशाच्च ‘तमोगुणी’, अंतरिक्षात वास्तव्य करणारे पिशाच्च ‘रजोगुणी’ तर वायुमंडलात राहणारे पिशाच्च ‘सत्वगुणी’ म्हटले जातात. हे पिशाच्च आपल्या घराण्यातील जे पूर्वज आहेत त्यांना त्रास देतात. या त्रासामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक दुर्धर संकटे येतात. कार्यसिद्धी होत नाही, संतती होण्यास अडचणी येतात. लग्नकार्य जुळत नाही. व्यवसायात नुकसान होते. सततचे आजारपण वाट्याला येते. त्यामुळे अशा पिशाच्चांपासून सुटका करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.
त्र्यंबकेश्वर मधील ‘कुशावर्त ’ म्हणून प्रसिद्ध तीर्थ हे भक्तांना सर्व इच्छित लाभ देणारे आहे. इथे गौतम ऋषींनी गोदावरी नदीला दर्भाने आवृत्त केले म्हणजे बांधले (अडविले) म्हणून ह्या पवित्र तीर्थावर केलेले स्नान, दान, तर्पणादि पित्रांना शांती देणारे आहे. त्यामुळेच प्राचीन काळापासून आजदेखील हजारोंच्या संख्येत भक्तगण त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी श्राद्ध पूजा करण्यासाठी जमतात.
त्रिपिंडी श्राद्ध पूजा अमावास्येला केलेले उत्तम असते. पितरांच्या शांतीसाठी अमावस्या हा उत्तम दिवस असतो. पितृपक्षातील अमावास्या ही त्रिपिंडी श्राद्धासाठी विशेष मानली जाते. भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला श्राद्ध पौर्णिमा म्हटले जाते. पौर्णिमेपासून पुढील १६ दिवस पित्रांच्या तर्पणासाठी उत्तम आहेत. याशिवाय वर्षभरात देखील असे अनेक महत्वाचे योग असतात ज्या दिवशी पित्र अन्न ग्रहण करण्यासाठी भूलोकावर येतात. “धर्मसिन्धु” ह्या ग्रंथात ९६ कालखंडाचे वर्णन आढळते. तसेच आपण याबद्दल सविस्तर माहितीसाठी आमच्या अधिकृत वेब पोर्टलवरील "ताम्रपत्रधारी" गुरुजींना संपर्क करू शकता.
सर्व प्रकारच्या अतृप्त आत्म्याच्या सद्गती प्राप्तीसाठी त्रिपिंडी श्राद्ध अवश्य केले पाहिजे. ह्या श्राद्ध विधीमध्ये गोत्र किंवा पित्रांच्या नामाचे उच्चारण केले जात नाही कारण कुठली बाधा कुठल्या पित्रांकडून आली आहे हे माहीत नसते. सर्व प्रकारच्या पित्रांच्या सद्गतीप्राप्तीसाठी धर्मग्रंथांमध्ये त्रिपिंडी श्राद्धाचे विधान सांगितले आहे. या पूजेमध्ये पुढीलप्रमाणे विधी केल्या जातात.
मग ह्या तीनही पिंडांना दर्भांवर पसरवून त्यावर तिलोदक शिंपडून पिंडदान करावे. पिंडाची पूजा करावी आणि श्री विष्णुंच्या प्रसन्नतेसाठी तर्पण करावे. आलेल्या गुरुजींना भोजन देऊन त्यांना दक्षिणेच्या स्वरूपात सोने चांदी, वस्त्र, पात्र, पंखा, पादत्राण इत्यादी वस्तूंचे दान द्यावे.
भारतीय संस्कृतीत अगदी वैदिक काळापासून श्राद्ध केले जाते. पित्रांच्या शांतीसाठी श्रद्धा व शुभ संकल्पाने केल्या जाणाऱ्या पिंडदान व तर्पण विधीला ‘श्राद्ध’म्हटले जाते. 'श्राद्ध' केल्याने त्या आत्म्याला शांती लाभते.
त्रिपिंडी श्राद्ध पूजेला ३ तास लागतात.
पूजा मूल्य / दक्षिणा ही पूर्णतः पूजेसाठी आवश्यक वस्तूंवर (पूजा सामग्री) अवलंबून आहे. त्रिपिंडी श्राद्ध पूजा संपन्न झाली की पुरोहितांना दक्षिणा देऊन ह्या विधीची सांगता होते.
स्मरणार्थ केलेले टिपण:- त्रिपिंडी श्राद्धासारखेच पितृदोषावर परिणामकारक असे नारायण-नागबली शांती पूजा शांती पूजा देखील त्र्यंबकेश्वालाच होते. त्रिपिंडी श्राद्ध हा २-३ तासाचा विधी आहे. यासोबतच आपण नारायण-नागबळी देखील करू शकता. नारायण-नागबळी पूजा ३ दिवसाची असते. या दोन्ही पूजा एकूण ३ दिवसातच केल्या जातात. ज्यामुळे वेगळे कालावधी द्यावे लागत नाही. पूजेचे उत्तम परिणाम प्राप्त होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेब पोर्टलवर दिलेल्या अधिकृत ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच संपर्क साधावा.
संपर्कांसाठी पत्ता: श्री गंगा गोदावरी मंदिर, पहिला मजला, कुशावर्त तीर्थ चौक, त्र्यंबकेश्वर - ४२२२१२
Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved
Designed and Developed By | AIGS Pvt Ltd