Trimbak Mukut

Panditji in Trimbakeshwar Shiva Temple

"Thanks for having our services. we help you to fullfill spritual need "

Trimbak Mukut

Pandit Profile

Name: Pramod Pingale

Age: 43 Years

Experience: 29 Years

8087488810

PUJA OFFER


Click To Get Location
House No. 135, Keshav Niwas, Near Ekmukhi Datta Mandir, Pach Aali, Trimbakeshwar, Nashik


Share Profile
Tamrapatra of Pramod Pingale
पिंगळे कुटूंब ३५० वर्षांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पाच आळी, परशुराम मंदिर, पिंगळे वाडा येथे वास्तव्यास आहे. कालसर्प शांती पूजेचा संकल्प आमचे आजोबा (श्री .पद्माकर भास्कर पिंगळे यांचे काका) वे .शा. सं. कै. पुरुषोत्तम त्र्यंबक पिंगळे यांनी प्रथम साधारणपणे ७५ वर्षांपूर्वी लिहिला. त्यांनीच संपूर्ण पोथी लिहून शास्त्रोक्त पद्धतीने कालसर्प शांतीची सुरुवात त्र्यंबकेश्वर मध्ये केली. आज संपूर्ण त्र्यंबकेश्वर मध्ये हा विधी केला जातो. ब्रम्हा, विष्णू, महेश एकाच ठिकाणी असल्यामुळे ह्या विधीस येथे विशेष महत्त्व आहे. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगां मधील १० वे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. श्री. प्रमोद पद्माकर पिंगळे हे गेली २० वर्षांपासून येथे कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्राद्ध , नारायण नागबली, नक्षत्र शांती , रुद्राभिषेक, लघुरुद्र आणि इतर विधी शास्त्रोक्त पद्धतीने करतात.  कालसर्प योग जन्माच्या वेळेनुसार तयार करण्यात आलेल्या जन्म कुंडलीत बारा भाव / स्थान असतात. जन्म कुंडलीचे हे स्थान नवग्रहांची स्थिती आणि योग जातकाच्या भविष्याबाबत संपूर्ण माहिती प्रकट करते. जन्म कुंडलीच्या विभिन्नस्थानात या नवग्रहांची स्थिती आणि योगाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या शुभ अशुभ योग तयार होतात. हे योग त्या व्यतीच्या जीवनावर आपला शुभ अशुभ प्रभाव पाडतात. ग्रह जेव्हा जन्म कुंडलीच्या एका स्थानावर एकत्रित होतात तेव्हा जी परिस्थिती निर्माण होते तिला योग म्हणतात. कालसर्प योगाचा विचार करण्यापूर्वी राहू व केतू बद्दल प्रथम विचार केला पाहिजे कारण राहू हे सापाचे मुखअसून केतू हे शेपूट आहे. या दोन ग्रहांमुळे कालसर्प योग होतो असे म्हणतात. कालसर्प योग जैन ज्योतिष ग्रंथातून रूढ झाला असावा. मुख्य रूपाने १२ प्रकारचे कालसर्प योग असतात अनंत कालसर्प योग, कुलिक कालसर्प योग , वासुकि कालसर्प योग , शंखपाल कालसर्प योग, पद्म कालसर्प योग, महापद्म कालसर्प योग, तक्षक कालसर्प योग, कर्कोटक कालसर्प योग, शंखनाद कालसर्प योग, पातक कालसर्प योग, विशधर कालसर्प योग, शेषनाग कालसर्प योग, पितृदोष नारायण नागबली  नारायण नागबली ह्या दोन विधी मानवाच्या अपूर्ण इच्छा, कामना पूर्ण करण्याच्या उद्देशाने केल्या जातात. नारायण बलि आणि नागबली हे दोन वेगवेगळे विधी आहेत. नारायण बली चा मुख्य उद्देश पितृदोष निवारण्यासाठी करतात आणि नागबली हा विधीसर्प / साप हत्येचा दोष निवारण्यासाठी करतात.हे दोन्ही विध एकत्र करावे लागतात. पितृदोष निवारण्यासाठी नारायण नागबली विधी करण्याचे शास्त्रामधे सुचवले आहे. हे विधी जातकाच्या दुर्भाग्य संबंधीदोषांपासून मुक्त करण्यासाठी करतात. या पध्दतीने शास्त्राला अनुसरुन नारायणबली विधी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच होतो.  रुद्र अभिषेक अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रुद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.  हा अभिषेक त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक ब्राम्हणांकडूनच केला जातो. संस्कृत मधील मंत्र म्हणून अभिषेक केला जातो. यावेळी ह्या मंत्रांचा मोठमोठ्याने उच्चार केला जातो. पंचामृतामधे दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पदार्थ असतात.  जन्म नक्षत्र शांति आपल्या प्राचिन वैदिक ज्योतिष अनुसार आपल्या जीवनात जन्म नक्षत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात. आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याला जन्म नक्षत्र म्हाणतात. हे जन्म नक्षत्र आपल्या दृष्टीकोनावर, भविष्यावर प्रभाव पाडतात. जन्म नक्षत्र आपल्या विचार, भाग्य, सहज ज्ञान यांना निर्धारित करते आणि व्यक्तित्वाच्या अवचेतानालाही नियंत्रित करते. नक्षत्र शांति पूजा दरवर्षी जन्म नक्षत्र संरक्षण आणि वर्षभर चांगले परिणाम देण्यासाठी केली जाते. नक्षत्र पूजेत आयुष्य होम (दीर्घायु), मृत्युंजय होम (चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि रोगांपासून सुटकेसाठी ), नवग्रह दोष शान्ति पूजा, सप्त चिरंजीवी पूजा/होम यांचा समावेश होतो. चिरंजीवी व्यक्ति तो आहे जो कधी मरत नाही. यात बाली, व्यास , हनुमान , विभिषन, परशुराम आणि कृपा यांचा समावेश होतो. यात अधिक मनो वांछित लाभ प्राप्त होतात.  नवग्रह शांति वेद आणी शास्त्रांच्या नुसार नाऊ ग्रह आणि सौर प्रणाली ज्यांच्या जन्म कुंडलीतील स्थितीनुसार तुमच्या जीवनावर प्रभाव पडत असतात. अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करून शुभ ग्रहांना अनुकूल बनविण्यासाठी मंत्र , प्रार्थना , जप केला जातो. ज्या ग्रहाचा जप करायचा त्या ग्रहाच्या अनुकूल रंगाचे वस्त्र, माळा, तिळक तसेच रत्न धारण केल्याने शीघ्र लाभ मिळतो. पंचक शांति हिंदू धर्मानुसार मृत्युला जीवनाचा अंत समझला जात नाही , तर तो शरीर सोडल्यानंतर आत्म्याचा 'मोक्षाकडे ' जाण्याचा प्रवास आहे. पंचकच्या तिथी ज्योतिषीय गणने नुसार ठरतात. पंचक व्यक्तीच्या मरणासाठी अतिशय वाईट क्षण आहे. पंचक पाच नक्षत्रांचा संयोग आहे (धनिष्ठा, शतभिशा, पूर्वा भद्रापद, उत्तरा भद्रापद आणि रेवती).

Write a Review

No reviews found for this Pandit yet.

Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved | Designed and Developed By AIGS Pvt Ltd